कच्चे तेल महाग, तरी पेट्रोल-डिझेल दर स्थिर; आजचे भाव पाहा

नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले असून, देशातील प्रमुख शहरांमध्ये कालचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत.
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. एका बॅरल कच्च्या तेलाची किंमत ७६ डॉलरच्या पुढे गेली असली, तरी भारतातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुढील काही महिन्यांत ऊर्जा क्षेत्रातील किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, २५ मे २०२६ नंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी मे महिन्यात विधानसभा निवडणुकांनंतर अवघ्या ११ दिवसांत चार टप्प्यांत इंधन दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर मात्र दर स्थिर आहेत.

प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर (प्रति लिटर)
* दिल्ली – ₹१०२.१२
* मुंबई – ₹१११.२१
* कोलकाता – ₹११३.५१
* चेन्नई – ₹१०७.७७
* पाटणा – ₹११३.३७

प्रमुख शहरांतील डिझेलचे दर (प्रति लिटर)
* दिल्ली – ₹९५.२०
* मुंबई – ₹९७.८३
* कोलकाता – ₹९९.८२
* चेन्नई – ₹९९.५५
* पाटणा – ₹९९.३६

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत राहिल्यास भविष्यात इंधन दरांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र सध्या तरी देशातील वाहनधारकांना इंधन दरवाढीचा फटका बसलेला नाही.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…