अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणाला नवे वळण; योग केंद्रात QR कोड असलेली रहस्यमय पेटी, पाच लाखांची रोकड जप्त

अयोध्या :अयोध्या येथील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आठ आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अविनाश शुक्ल याच्याशी संबंधित एका योग केंद्रातून QR कोड असलेली रहस्यमय पेटी आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश शुक्ल हा त्याचा भाऊ अभिषेक शुक्ल याच्यासोबत कौशलपुरी येथील एका योग केंद्रात राहत होता. या केंद्रावर छापा टाकल्यानंतर पोलिसांना “राम राज्य कोश” आणि “राम राज्य प्रशासन” अशी नोंद असलेली पेटी आढळली. या पेटीवर पेटीएमचा QR कोडही लावलेला होता. QR कोड स्कॅन केल्यानंतर “राम राज्य कोश”मध्ये पैसे जमा करण्याचा पर्याय दिसून आल्याने या पेटीच्या वापराबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.
५ जून रोजी राम मंदिरातील चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याच रात्री श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सूचनेनुसार पोलिसांनी संबंधित योग केंद्रावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर योग केंद्रातील साधकांनी अभिषेक शुक्ल राहत असलेली खोली रिकामी करून तिला कुलूप लावले. त्यानंतर अभिषेकनेही तेथून दुसरीकडे स्थलांतर केले.अभिषेक शुक्ल हा व्यवसायाने शिक्षक असून तो गेल्या दहा वर्षांपासून या योग केंद्रात राहत होता. नोकरी लागल्यानंतर त्याने अविनाशलाही तेथे आणले होते. केंद्राच्या व्यवस्थापनाशी संबंधित यादीतही त्याचे नाव नोंदविण्यात आले होते. दोघेही उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अविनाशला अटक झाल्यानंतर पोलिसांनी अभिषेकलाही चौकशीसाठी योग केंद्रात आणून तपास केला. योगाचार्य सीमा तिवारी यांनी सांगितले की, अभिषेक अनेक वर्षांपासून केंद्रात राहत होता. मात्र, अविनाशच्या वागण्यात संशयास्पद बाबी जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, पोलिसांनी केंद्रातून पाच लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…