अमृत संस्थेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रतिनिधी ) : अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) अहिल्यानगर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था तसेच साईदीप सह्याद्री हॉस्पिटल व शिवतीर्थ मित्र मंडळ, भुतकरवाडी-बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा माझे योगदान’ (एक दिवस राष्ट्रासाठी) या उपक्रमांतर्गत १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हे शिबिर शिवतीर्थ मित्र मंडळ, भारत कॉलनी, भुतकरवाडी-बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील ३९ महिला व पुरुषांनी लाभ घेतला. यावेळी साईदीप हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. शिबिरात विशेषतः रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी व अमृत मित्र सुजल झुंजारे यांनी सहकार्य केले. अमृत संस्थेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’ या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी दिली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार, हिंदू-वीरशैव लिंगायत, हिंदू-लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…