PM Kisan Yojana : २४ व्या हप्त्यात ₹३,००० मिळणार? सरकारने अफवांवर पूर्णविराम; कृषिमंत्र्यांनी दिलं स्पष्ट उत्तर

पीएम किसान योजनेच्या आर्थिक मदतीत सध्या कोणतीही वाढ होणार नसून, पात्र शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे ₹२,००० चाच हप्ता मिळणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी पीएम किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २४ व्या हप्त्याआधी वार्षिक आर्थिक मदत ६ हजार रुपयांवरून ९ हजार रुपये होणार, तसेच पुढील हप्ता ३ हजार रुपयांचा मिळणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर आता केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात सांगितले की, पीएम किसान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वार्षिक ६ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा सध्या सरकारसमोर कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे २४ व्या हप्त्यातही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नेहमीप्रमाणे ₹२,००० इतकीच रक्कम जमा होणार आहे.  सध्या देशभरातील लाखो शेतकरी २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. वाढत्या शेती खर्चाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीत वाढ व्हावी, अशी अपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे ६ हजार रुपयांची वार्षिक मदत वाढवून ९ हजार रुपये करण्याची चर्चा वेगाने सुरू होती. मात्र, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन समान हप्त्यांमध्ये एकूण ₹६,००० आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत २३ वा हप्ता वितरित झाला असून, पुढील २४ व्या हप्त्यातही लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच ₹२,००० मिळणार आहेत. भविष्यात या योजनेत कोणताही बदल झाल्यास त्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून केली जाईल.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

8th Pay Commission : पुराने पेंशनर्स के लिए बड़ा सवाल, PM मोदी से सीधे हस्तक्षेप की मांग

नई दिल्ली : आठवें वेतन आयोग को लेकर केंद्रीय कर्मचारी ही नहीं, बल्कि रिटायर हो चुके कर्मचारी और पेंशनर्स भी अपनी मांगों को लेकर सक्रिय हो गए हैं। आयोग की…

ऐन गणेशोत्सव में सोना हुआ सस्ता, कीमतों में बड़ी गिरावट; जानें 18K, 22K और 24K के आज के भाव

Gold Price Today : गणेशोत्सव के बीच सोना-चांदी खरीदने वालों के लिए राहत भरी खबर सामने आई है। 11 सितंबर को सोने और चांदी की कीमतों में बड़ी गिरावट दर्ज…