LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर; मुंबईत किती रुपये मोजावे लागणार?

घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल, बुकिंगपूर्वी ग्राहकांनी जाणून घ्या आजचे दर

मुंबई : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यामुळे घरगुती १४.२ किलो आणि व्यावसायिक १९ किलो गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी ग्राहकांनी आजचे अपडेटेड दर तपासणे गरजेचे आहे.

इंडियन ऑइल, एचपी गॅस आणि भारत गॅस या प्रमुख तेल कंपन्यांकडून दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठा बदल झालेला नसला, तरी विविध शहरांमध्ये किमतींमध्ये काही प्रमाणात फरक दिसून येत आहे. मुंबईतील ग्राहकांना १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ९४१.५० रुपये मोजावे लागणार आहेत. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत २,८८५.५० रुपये इतकी आहे.

देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९४२ रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत २,९३० रुपये आहे. कोलकातामध्ये घरगुती सिलिंडर ९६८ रुपये, तर कमर्शियल सिलिंडर ३,०८१.५० रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकांना ९५७.५० रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरसाठी ३,१०६ रुपये खर्च करावे लागतील. नोएडामध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ९३९.५० रुपये, तर लखनऊमध्ये ९७९.५० रुपये इतकी आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे घरगुती गॅस सिलिंडरचे दर तुलनेने जास्त असून ग्राहकांना एका सिलिंडरसाठी १,०३१.५० रुपये द्यावे लागणार आहेत. जयपूरमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ९४५.५० रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत २,९५७.५० रुपये आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर याचा कितपत परिणाम होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…