नांदेडमध्ये हरित वाहतुकीला वेग; जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन; जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये मिळणार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा

नांदेड : पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने नांदेड जिल्ह्याने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून उभारण्यात आलेल्या ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार आनंद तिडके-बोंडारकर, आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये चार्जिंग सुविधा

इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांच्या तहसील कार्यालयांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या चार्जिंग केंद्रांवर 60 किलोवॅट क्षमतेचे फास्ट चार्जर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येणार असून नागरिकांना माफक दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार चालना

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणे ही वाहनधारकांसाठी मोठी सोय ठरणार आहे. या उपक्रमामुळे इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असून हरित ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाला देखील चालना मिळणार आहे. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नांदेड जिल्हा शाश्वत आणि हरित विकासाच्या दिशेने पुढे जात असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

खडकवासला धरणसाखळी तुडुंब! पुण्याच्या पाणीटंचाईची चिंता संपली

पुणे :  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच…

मुंबई लोकल फिर हुई लेट! रेलवे ने यात्रियों को बताया वजह, रोजाना सफर करने वालों में बढ़ा गुस्सा

मुंबई :  मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन एक बार फिर चर्चा में है। लगातार देरी से चल रही डहाणू-चर्चगेट (93002) लोकल से परेशान यात्रियों का सब्र अब…