घरातून निघून गेलेला १६ वर्षीय मुलगा परभणीत सापडला; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे पुन्हा कुटुंबीयांच्या कुशीत

परभणी :  परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे घरातून न सांगता निघून गेलेल्या १६ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कार्यवाहीमुळे हरवलेला मुलगा पुन्हा आपल्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचला.

मंगळवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर नियमित गस्त घालत असताना सहाय्यक उपनिरीक्षक भीमराव उत्तमराव जोगदंड यांच्या निदर्शनास एक अल्पवयीन मुलगा एकटाच संशयास्पदरित्या फिरताना आला. त्यांनी तत्काळ मुलाशी संवाद साधत प्राथमिक चौकशी केली आणि पुढील पडताळणीसाठी त्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या परभणी चौकीत आणले. चौकशीदरम्यान मुलाने आपले नाव आकाश (वय १६ वर्ष) असून तो निजामाबाद येथे राहतो, तसेच कोणालाही न सांगता घरातून निघून आल्याचे सांगितले. मुलगा अल्पवयीन असल्याने रेल्वे सुरक्षा बलाने तातडीने चाइल्ड हेल्प लाईनचे प्रतिनिधी यशवंत सोनकांबळे यांच्या समवेत त्याला बालकल्याण समिती, परभणी यांच्यासमोर हजर केले.

बालकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधून सर्व पडताळणी व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आकाशला त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. रेल्वे सुरक्षा बलाच्या या संवेदनशील आणि तत्पर कार्यवाहीमुळे एका कुटुंबाची मोठी चिंता दूर झाली. दक्षिण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाकडून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत रेल्वे परिसरात आढळणाऱ्या हरवलेल्या, बेवारस किंवा असुरक्षित स्थितीतील मुलांचे संरक्षण, पुनर्वसन आणि त्यांच्या कुटुंबीयांशी पुनर्मिळवणी करण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घरापासून दूर गेलेल्या मुलाला सुरक्षितपणे पुन्हा आपल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याची ही घटना रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेसोबतच त्यांच्या मानवी संवेदनशीलतेचेही उदाहरण ठरली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

खडकवासला धरणसाखळी तुडुंब! पुण्याच्या पाणीटंचाईची चिंता संपली

पुणे :  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच…

मुंबई लोकल फिर हुई लेट! रेलवे ने यात्रियों को बताया वजह, रोजाना सफर करने वालों में बढ़ा गुस्सा

मुंबई :  मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन एक बार फिर चर्चा में है। लगातार देरी से चल रही डहाणू-चर्चगेट (93002) लोकल से परेशान यात्रियों का सब्र अब…