Gold Rate Today : सोन्याने पुन्हा घेतली उसळी; २४ कॅरेट १० तोळ्यांमागे ₹३७ हजारांची वाढ, चांदीही महागली

जुलै महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील आठवडाभर घसरणीचा कल दिसत असताना आता सोन्याने पुन्हा उसळी घेतली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या १० तोळ्यांच्या दरात तब्बल ३७ हजार रुपयांची वाढ झाली असून १ किलो चांदीही ५ हजार रुपयांनी महागली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.
आजच्या दरानुसार २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव १,४४,५५० रुपयांवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १,३२,५०० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर १,०८,४१० रुपये आहे.

आजचे सोन्याचे दर
२४ कॅरेट (24K)
१ ग्रॅम – ₹१४,४५५
८ ग्रॅम – ₹१,१५,६४०
१० ग्रॅम – ₹१,४४,५५०
१०० ग्रॅम – ₹१४,४५,५००

२२ कॅरेट (22K)
१ ग्रॅम – ₹१३,२५०
८ ग्रॅम – ₹१,०६,०००
१० ग्रॅम – ₹१,३२,५००
१०० ग्रॅम – ₹१३,२५,०००
१८ कॅरेट (18K)
१ ग्रॅम – ₹१०,८४१
८ ग्रॅम – ₹८६,७२८
१० ग्रॅम – ₹१,०८,४१०
१०० ग्रॅम – ₹१०,८४,१००

मुंबई, पुणे आणि दिल्लीतील दर
मुंबई आणि पुण्यात सोन्याचे दर समान आहेत. या दोन्ही शहरांत २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१४,४५५ प्रति ग्रॅम, २२ कॅरेट ₹१३,२५० आणि १८ कॅरेट ₹१०,८४१ प्रति ग्रॅम आहे. तर दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१४,४७०, २२ कॅरेट ₹१३,२६५ आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ₹१०,८५६ प्रति ग्रॅम आहे.

चांदीचे आजचे दर
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. १ किलो चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची वाढ झाली असून सध्या १ किलो चांदीचा भाव ₹२,४५,००० इतका आहे.
१ ग्रॅम – ₹२४५
८ ग्रॅम – ₹१,९६०
१० ग्रॅम – ₹२,४५०
१०० ग्रॅम – ₹२४,५००
१००० ग्रॅम – ₹२,४५,०००
दरवाढीमुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना अधिक खर्च करावा लागणार असून आगामी काही दिवसांत बाजारातील चढ-उतारांकडे खरेदीदारांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

लोहपुरुषाचा अखंड भारत, जगातील सर्वात उंच कर्तृत्व आणि आजच्या युवाशक्तीपुढील आव्हाने

एकतीस ऑक्टोबर हा केवळ आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या एका पोलादी महापुरुषाच्या उपकारांचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस आहे. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती…

औष्णिक विद्युत केंद्राच्या औद्योगिक भेटीतून ४३ विद्यार्थ्यांना मिळाले वीज निर्मिती प्रक्रियेचे प्रत्यक्ष ज्ञान!

चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर घालण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष औद्योगिक कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी ट्रस्ट संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान…