LPG Price Today: घरगुती गॅसचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती भाव?

कमर्शियल एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरात १ जुलैपासून १८३.५० रुपयांची मोठी कपात करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांचे लक्ष घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींकडे लागले होते. मात्र २ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या दरांनुसार १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.
पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यानंतर देशातील सरकारी तेल कंपन्यांनी १ जुलै रोजी १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात केली. मागील काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यामुळे इंधनासह एलपीजीच्या किमती वाढल्या होत्या. आता पुरवठा सुरळीत होत असल्याने घरगुती सिलेंडरच्या दरातही कपात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या तरी घरगुती दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
२ जुलै २०२६ रोजीच्या दरांनुसार मुंबईमध्ये १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलेंडर ९४१.५० रुपये तर १९ किलोचा कमर्शियल सिलेंडर २,८८५ रुपये आहे. पुण्यात घरगुती सिलेंडर ९४५ रुपये आणि कमर्शियल सिलेंडर २,९४६ रुपये दराने मिळत आहे. नागपुरात घरगुती सिलेंडरची किंमत ९९३.५० रुपये असून कमर्शियल सिलेंडर ३,१०९ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये घरगुती सिलेंडर ९४४.५० रुपये आणि कमर्शियल सिलेंडर २,९०८ रुपये, नाशिकमध्ये घरगुती सिलेंडर ९४५.५० रुपये व कमर्शियल सिलेंडर २,९६१.५० रुपये, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती सिलेंडर ९५०.५० रुपये आणि कमर्शियल सिलेंडर २,९९०.५० रुपये दराने उपलब्ध आहे.
दरम्यान, १ जुलैपासून लागू झालेल्या सुधारीत दरांनुसार दिल्लीमध्ये १९ किलोचा कमर्शियल एलपीजी सिलेंडर २,९३० रुपये, मुंबईमध्ये २,८८४ रुपये, कोलकात्यात ३,०७२ रुपये आणि चेन्नईमध्ये ३,०९९ रुपये दराने उपलब्ध आहे. घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र सध्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…