बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर येत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाच्या 9 व्या फेरीच्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 78 हजार 528 मतांनी आघाडीवर आहे. सुनेत्रा पवारांची ही आघाडी आणखी वाढत जाणार असून विजयही जवळपास निश्चित झाला आहे. यादरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते, असं उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं.
अजितदादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची…असं सुनेत्रा पवार पोस्टद्वारे म्हणाल्या.
अजितदादांचा विक्रम मोडण्यासाठी एक लाख 65 हजार 266 मतांचा जादुई आकडा-
बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र एक्झिट पोलनुसार बारामतीत सुनेत्रा पवार दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे. दरम्यान बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख 65 हजार 265 मताधिक्याने पराभव केला होता. त्यामुळे आता विक्रम मोडण्यासाठी एक लाख 65 हजार 266 हा जादुई आकडा असणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…