विधान परिषदेच्या 10 जागांवर बिनविरोध निवडणूक; सर्व उमेदवार निश्चित

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता आणि 12 मे रोजी मतदान होणार होते, मात्र आता मतदानाची गरज भासणार नाही. या निवडणुकीसाठी एकूण 10 उमेदवारांनीच अर्ज दाखल केले असून, जागांच्या संख्येइतकेच उमेदवार असल्याने निवडणूक बिनविरोध ठरली आहे. यामध्ये भाजपकडून 6, शिवसेना शिंदे गटाकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 1 आणि महाविकास आघाडीकडून 1 उमेदवाराचा समावेश आहे. तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी आवश्यक 10 आमदारांचे सूचक समर्थन नसल्यामुळे त्यांचे अर्ज बाद होणार आहेत. त्यामुळे सर्व 10 जागांवर आता बिनविरोध निवड झाली असून, अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.

  • लोकतंत्र मिरर

    लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

    Related Posts

    नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

    अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

    रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

    प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…