शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 2 उमेदवार जाहीर; नीलम गोऱ्हे, बच्चू कडूंना उमेदवारी

अखेर शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे विधान परिषद निवडणुकीसाठीचे दोन्ही उमेदवार ठरले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार ठरले असून काही वेळेत दोन्ही उमेदवार उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. थोड्याच वेळात मुख्यनेते एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत दोन्ही नेते विधान भवनात अर्ज भरण्यासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर गेल्या २४ तासात झालेली चर्चा आणि समोर ठेवलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केल्यानंतर आज बच्चू कडू शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहेत, पक्षप्रवेशानंतर आज शिवसेनेकडून त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सुरूवातीपासूनच नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. आज या दोन्ही नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते आता आपला उमेदवारी अर्ज भरत आहे.
बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंनी दोन्ही नावे जाहीर केली आहे, त्यांनी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांची नावे जाहीर केली, त्याचबरोबर माझं सगळ्यांवर लक्ष असतं, सगळ्यांना संधी मिळेल, माझं सगळ्यांवर लक्ष असलतं असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…