अहिल्यानगरमध्ये १४ नोव्हेंबरपासून संगीतमय श्रीराम कथेचे आयोजन

अजयबुवा रामदासी यांच्या अमृतवाणीतून रंगणार भक्तिरसाचा सोहळा!

अहिल्यानगर. राधेशाम कुलकर्णी अहिल्यानगर जिल्हा प्रमुख: कार्तिक महिन्याचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात संगीतमय श्रीराम कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर ते रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बालिकाश्रम रोड येथील ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज चिंतामणी उपासना केंद्रात हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड येथील समर्थ भक्त कथाकार अजयबुवा रामदासी यांच्या रसाळ वाणीतून दररोज सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत श्रीराम कथेचे निरूपण होणार आहे.
प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील आदर्श, त्याग, कर्तव्यनिष्ठा, भक्ती आणि मर्यादा पुरुषोत्तम या स्वरूपाचे महत्त्व संगीतमय कथेतून उलगडले जाणार आहे. भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या कथेमुळे भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळणार आहे.
१४ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध पंचमीला कथेचा शुभारंभ होणार असून २२ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला सांगता होणार आहे. या संगीतमय श्रीराम कथेचा अहिल्यानगर शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

सहकारी साखर कारखान्यांना बायो-CBG प्रकल्पासाठी केंद्राचे पाठबळ

अहिल्यानगर. राधेशाम कुलकर्णी अहिल्यानगर जिल्हा प्रमुख: सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून बायो-CBG प्रकल्प उभारणीला केंद्र सरकारकडून मिळणारे पाठबळ हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्पामुळे देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे पाटील

अहिल्यानगर. राधेश्याम कुलकर्णी (अहिल्यानगर जिल्हा प्रमुख): अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी…