दिवाळी-छठपूजेसाठी नांदेड-पटना विशेष रेल्वे

नांदेड. दिवाळी आणि छठपूजेच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-पटना-नांदेड दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या तीन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07609 नांदेड-पटना विशेष रेल्वे नांदेड येथून दर मंगळवारी 10, 17 आणि 24 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 9.15 वाजता सुटणार आहे. ही गाडी पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर या स्थानकांवर थांबे घेत गुरुवारी सकाळी 8.30 वाजता पटना येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक 07610 पटना-नांदेड विशेष रेल्वे पटना येथून दर गुरुवारी 12, 19 आणि 26 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.15 वाजता सुटणार असून, शुक्रवारी रात्री 8 वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.
या विशेष रेल्वे गाडीला प्रथम श्रेणी वातानुकूलित, द्वितीय श्रेणी वातानुकूलित, द्वितीय श्रेणी शयनयान आणि सामान्य श्रेणीचे असे एकूण 24 डबे असणार आहेत.
दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अहिल्यानगरच्या ८ लाख शेतकऱ्यांना ४०३ कोटींची मदत जमा

अहिल्यानगर (प्रतिनिधी – राधेश्याम कुलकर्णी). जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने जाहीर केलेल्या अग्रीम मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८ लाख ७ हजार २८४…

निबंध स्पर्धेत अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांची चमक; अमृत संस्थेतर्फे विजेत्यांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी – राधेश्याम कुलकर्णी). महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने ऑगस्ट २०२६ मध्ये ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त आयोजित निबंध लेखन स्पर्धेत अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश…