निबंध स्पर्धेत अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांची चमक; अमृत संस्थेतर्फे विजेत्यांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी – राधेश्याम कुलकर्णी). महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने ऑगस्ट २०२६ मध्ये ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त आयोजित निबंध लेखन स्पर्धेत अहिल्यानगरमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. नाशिक विभागातून कु. देविका साळुंके आणि सौ. रेवती कुलकर्णी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले.
उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणाऱ्यांमध्ये कु. सिद्धी आशुतोष घाणेकर, कु. अक्षता बनकर, मा. नारायण मंगलाराम आणि मा. श्रेयस झरकर यांचा समावेश आहे.
या सर्व विजेत्यांचा ५ नोव्हेंबर २०२६ रोजी अहिल्यानगर येथील अमृत कार्यालयात सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. सहा वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित कलाकार अमोल बागुल आणि आशा एज्युकेशन फाउंडेशनचे व्यवस्थापक आशुतोष घाणेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी अमोल बागुल आणि आशुतोष घाणेकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी उपस्थित विजेत्यांना शुभेच्छा देत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी आणि अमृत सखी गौरी कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्था विविध योजना, प्रशिक्षण आणि उपक्रम राबविते, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी दिली.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अहिल्यानगरच्या ८ लाख शेतकऱ्यांना ४०३ कोटींची मदत जमा

अहिल्यानगर (प्रतिनिधी – राधेश्याम कुलकर्णी). जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने जाहीर केलेल्या अग्रीम मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८ लाख ७ हजार २८४…

दिवाळी-छठपूजेसाठी नांदेड-पटना विशेष रेल्वे

नांदेड. दिवाळी आणि छठपूजेच्या सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-पटना-नांदेड दरम्यान विशेष रेल्वे गाडीच्या तीन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना…