चेहऱ्याच्या गंभीर फ्रॅक्चरवर डॉ. विखे पाटील हॉस्पिटलमध्ये तीन यशस्वी शस्त्रक्रिया

आधुनिक ORIF तंत्राद्वारे उपचार; आयुष्मान भारत योजनेतून तिन्ही रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : चेहऱ्याच्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्लास्टिक सर्जरी विभागाने तीन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. विशेष म्हणजे, या तिन्ही रुग्णांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ मिळाला.

या तीन रुग्णांपैकी पहिल्या रुग्णाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूच्या वरच्या जबड्याचे (Maxilla), खालच्या जबड्याचे (Mandible) आणि गालाच्या हाडाचे (Zygomatic Bone) फ्रॅक्चर झाले होते. दुसऱ्या रुग्णाच्या खालच्या जबड्याचे, तर तिसऱ्या रुग्णाच्या गालाच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले होते. प्रत्येक रुग्णाच्या दुखापतीचे स्वरूप आणि संभाव्य गुंतागुंत लक्षात घेऊन स्वतंत्र शस्त्रक्रिया नियोजन करण्यात आले.

चेहऱ्याची नैसर्गिक रचना पूर्ववत करण्यावर भर

या शस्त्रक्रियांसाठी ORIF (Open Reduction and Internal Fixation) या आधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला. या पद्धतीमध्ये फ्रॅक्चर झालेली हाडे योग्य स्थितीत आणून विशेष वैद्यकीय प्लेट्स आणि स्क्रूच्या साहाय्याने स्थिर केली जातात. यामुळे हाडांची योग्य जुळणी होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्याची नैसर्गिक रचना, दातांची जुळणी आणि जबड्याची कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी ही उपचारपद्धती महत्त्वपूर्ण ठरते. प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजित काळे, डॉ. धीरज जुमडे आणि डॉ. अश्विन वानखेडे यांनी या शस्त्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉक्टरांच्या समन्वयातून तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.

आयुष्मान भारत योजनेतून मोफत उपचार

चेहऱ्याच्या हाडांच्या गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियांसाठी विशेष उपकरणे, वैद्यकीय साहित्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. मात्र, या तिन्ही रुग्णांवर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना आधुनिक उपचार मिळण्यासोबतच आर्थिक दिलासाही मिळाला.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने आणि वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात विशेष वैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणावर भर दिला जात आहे.

चेहऱ्याच्या गंभीर दुखापतींवर अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने अहिल्यानगर आणि परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्लास्टिक सर्जरी विभागाच्या या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय सेवांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

देव-देश-धर्म संकल्पनेतून ‘द भक्ती बीट्स’चा अनोखा संगीताविष्कार; अहिल्यानगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : ‘देव-देश-धर्म’ या संकल्पनेतून अनाहत एक कलासृष्टीच्या वतीने ‘द भक्ती बीट्स’ या भजन जॅमिंग अँड फ्युजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावीर ग्रुपच्या विशेष सहकार्याने तसेच…

सरस्वती विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाची संवेदनात्मक फलक निर्मिती स्पर्धा उत्साहात

पूर्व प्राथमिक विभागातील कंडक्टरेसेससाठी सरस्वती विद्यालयात ‘संवेदनात्मक फलक निर्मिती स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले. बालशिक्षणामध्ये संवेदनाधारित अध्ययनाचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.…