परोपकार, सद्वर्तन और ज्ञानातूनच जीवनकल्याण : ह.भ.प. बा.ल. चोथवे महाराज

नांदेड (प्रतिनिधी) :  पापापासून दूर राहणे, पुण्यकर्म करणे आणि निर्मळ वृत्तीच्या सज्जनांची संगत ठेवणे, हीच जीवनकल्याणाची त्रिसूत्री आहे. केवळ धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा प्रवचन श्रवण करून जीवनात परिवर्तन घडत नाही, तर ग्रंथांमधील विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार ह.भ.प. बा.ल. चोथवे महाराज यांनी केले.

नांदेड शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राधिकानगर परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिर व साई-गणेश देवस्थानच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पाच दिवसीय धार्मिक महोत्सवात ते बोलत होते. २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व आध्यात्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रवचनात नारदगीतेतील सूत्रांचा आधार घेत चोथवे महाराज यांनी जीवन जगण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन स्पष्ट केला. महाभारतातील शांतीपर्वाचा संदर्भ देताना युद्धानंतर नैराश्यात गेलेल्या धर्मराजाला भीष्माचार्यांनी केलेल्या उपदेशाचे महत्त्व त्यांनी विशद केले. संकटाच्या काळात योग्य मार्गदर्शन आणि विवेकपूर्ण विचार माणसाला सावरण्याचे बळ देतात, असे ते म्हणाले.

संत तुकाराम महाराजांच्या ‘पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार’ या विचाराचा दाखला देत दुसऱ्याला वेदना न देणे आणि अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देणे, हीच पुण्यकर्माची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

चांगली संगत माणसाच्या विचारांवर आणि व्यक्तिमत्त्वावर संस्कार करते. त्यामुळे संतवाङ्मयाचे वाचन करण्याबरोबरच त्यातील शिकवण आपल्या जगण्यात उतरविणे आवश्यक आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये गाणे, मनोरंजन आणि संस्थांच्या प्रचाराला अधिक महत्त्व मिळत असून, त्यामुळे ग्रंथांमधील मूलभूत विचार मागे पडू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वक्तृत्व ही कला असली, तरी माणसाचा खरा प्रभाव त्याच्या आचरणातून निर्माण होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्या म्हणजे जीवनाला दिशा देणारा डोळा आहे. सत्य, विवेक आणि ज्ञान यांची जोपासना केल्याशिवाय जीवन समृद्ध होऊ शकत नाही. सत्याचा अर्थ केवळ खरे बोलणे एवढाच मर्यादित नसून परिस्थितीचा योग्य विचार करून विवेकाने वागणे, हाही त्याचा व्यापक अर्थ आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी चोथवे महाराज यांचे स्वागत उद्योजक शिवप्रसाद राठी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश महाराज नेरलकर यांनी केले. प्रवचनाला ह.भ.प. बाबू महाराज काकांडीकर, दि.मा. देशमुख, शिवप्रसाद राठी, मधुसूदन महाराज कापशीकर, डॉ. प्रमोद देशपांडे, जयंतराव वाकोडकर यांची उपस्थिती होती.

या धार्मिक महोत्सवाचे संयोजन योगेश महाराज, राजेश महाराज आणि अमर महाराज नेरलकर करीत आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मुंबई में FDA का बड़ा एक्शन! मसाला विक्रेताओं पर शिकंजा

मुंबई : खाने का स्वाद बढ़ाने वाले मसाले अगर मिलावटी या असुरक्षित हों, तो ये लोगों की सेहत के लिए बड़ा खतरा बन सकते हैं। इसी को ध्यान में रखते…

दिवाली से पहले FDA का बड़ा एक्शन! पुणे में 1,329 किलो सूखे मेवे और खाद्य सामग्री जब्त

पुणे : दिवाली का त्योहार नजदीक आते ही बाजारों में मिठाइयों और सूखे मेवों की खरीदारी बढ़ने लगी है। ऐसे में खाद्य पदार्थों की गुणवत्ता को लेकर भी सतर्क रहने…