‘श्री गुरु रविदास महाराज वस्तीगृह संपर्क अभियान’च्या प्रदेश संयोजकपदी ॲड. धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती

महाराष्ट्रभर अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मानले आभार

नागपूर, प्रणय डाबरे (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्री गुरु रविदास महाराज वस्तीगृह संपर्क अभियान’च्या प्रदेश संयोजकपदी भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केलेल्या अभियानाच्या प्रदेश समितीत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे अभियान २६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या नियुक्तीबद्दल ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. पक्षाने विश्वासाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि समर्पित भावनेने पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अभियानाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये सहसंयोजकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. यामध्ये विदर्भ विभागासाठी राहुल तुपसांडे, उत्तर महाराष्ट्र विभागासाठी प्रा. भानुदास बेरड, मराठवाडा विभागासाठी प्रा. पांडुरंग मांडकीकर, पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी भरत आमदापुरे आणि कोकण-ठाणे विभागासाठी प्रा. वर्षा भोसले माने यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील विविध वस्तीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत संत गुरु रविदास महाराज यांचे समतावादी विचार, सामाजिक समरसता, बंधुता, सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रहिताची भावना पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे आणि संतांच्या विचारांचा प्रसार करणे, ही अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रदेश संयोजकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सर्व सहसंयोजक आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यातील प्रत्येक विभागात अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

“पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्य करणार आहे. संत गुरु रविदास महाराज यांचे विचार वस्तीगृहांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, सामाजिक प्रबोधनाला चालना देणे आणि अभियानाची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार आहे,” अशी भावना ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मनोहारी मैत्र संघातर्फे मातृभूमी सेवा पुरस्कारांचे वितरण

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : संस्कृती ही समर्पणावर उभी असते. सत्यनिष्ठा आणि सत्याची पूजा हे संस्कृतीचे भूषण आहे. संस्कृतीला सत्याचा आधार नसेल तर ती निरर्थक ठरते. मराठी संस्कृती केवळ सत्यावरच…

परोपकार, सद्वर्तन और ज्ञानातूनच जीवनकल्याण : ह.भ.प. बा.ल. चोथवे महाराज

नांदेड (प्रतिनिधी) :  पापापासून दूर राहणे, पुण्यकर्म करणे आणि निर्मळ वृत्तीच्या सज्जनांची संगत ठेवणे, हीच जीवनकल्याणाची त्रिसूत्री आहे. केवळ धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा प्रवचन श्रवण करून जीवनात परिवर्तन घडत नाही,…