पुणे : मेट्रोच्या कामामुळे शिवनेरी पथ येथील चाफळकर कॉलनी, सुपार्श्वनाथ बंगलो सोसायटी आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोरील रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.
नागरिकांच्या तक्रारीनंतर राज्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित महामेट्रोचे अधिकारी, वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेतून रस्ता खुला करण्याबाबत तोडगा काढण्यात आला. या पाठपुराव्याला यश आले असून, आज संबंधित रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल वाहतूक विभागाचे खरात साहेब, महामेट्रोचे अतुल गाडगीळ सर व अविनाश कुमार तसेच पुणे महानगरपालिका पथविभाग प्रमुख राजेशजी बनकर साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता आणि समन्वयातून यशस्वी तोडगा काढण्यात आला.
सौ. तन्वी प्रशांत दिवेकर
उपाध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती, पुणे मनपा
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
श्री. प्रशांत प्रभाकर दिवेकर
समन्वयक, पर्वती मतदारसंघ
अध्यक्ष, रम्यनगरी को-ऑप हौसिंग सोसायटी


