वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना संघटनेचे निवेदन; २७ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : महावितरणमधील वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न : भारतीय मजदूर संघ) यांच्यावतीने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कंत्राटी कामगार महासंघाचे जिल्हा सचिव सचिन पाटील यांनी केले आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मंत्रालय, प्रकाशगड, कामगार आयुक्त कार्यालय आणि वांद्रे पोलीस ठाणे येथे आंदोलनाची नोटीस सादर केली. तसेच ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी केली. यावेळी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, कंत्राटी कामगार महासंघाचे अध्यक्ष निलेश खरात, सचिव सचिन मेंगाळे आदी उपस्थित होते.

वारंवार आश्वासने मिळूनही मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आगामी आंदोलनासह पुढील टप्प्यांतही कामगारांनी संघटनेच्या अधिकृत सूचनांनुसार सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. “आता केवळ आश्वासने नकोत, तर ठोस निर्णय हवा,” अशी भूमिका मांडत कामगारांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…