अमरावती ,राज माहोरे (प्रतिनिधी) : युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राजापेठ येथील मुख्य कार्यालयात कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अमरावती महानगरपालिकेच्या विद्यमान शिक्षण सभापती ॲड. प्रीती हर्षल रेवणे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ताकदीने लढवावी, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक मतदारसंघात संघटनबांधणीला वेग देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ॲड. प्रीती हर्षल रेवणे यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० शिक्षक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पाच जिल्ह्यांत एकूण ५०० शिक्षक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पाच जिल्ह्यांतील ५६ तालुक्यांमध्ये प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून, प्रचारासाठी पथके संबंधित तालुक्यांकडे रवाना झाली आहेत. ॲड. प्रीती रेवणे यांच्या विजयासाठी नियोजनबद्ध पद्धतीने संघटनात्मक कामाला सुरुवात करण्याचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक सुमारे पाच तास सुरू होती.
या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, मार्गदर्शक सुनील राणा, उपमहापौर सचिन भेंडे, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, सुखदेव कावरे, विनोद जायलवाल, प्रा. अजय गाडे, शिवदास घुले, गणेशदास गायकवाड, समाधान वानखडे, प्रमोद येवतीकर, निलेश कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, प्रा. प्रशांत वानखडे, नगरसेवक अजय जयस्वाल, प्रा. ओम मुंदे, प्रा. सतीश खोडे, प्रा. संतोष बनसोड, प्रा. नितीन अनासाने, प्रा. खुशाल अळसपुरे, प्रा. राकेश बडगुजर, प्रा. हर्षल निंभोरकर, प्रा. अंजली पांडे, प्रा. संगीता भामगढीया, प्रा. कल्पना यावले, प्रा. अमोल मिलखे, प्रा. सचिन होले, प्रा. आशिष मालु, प्रा. लोकेश मते, प्रा. संदीप मृतुडकर, प्रा. नाना आमले, प्रा. रेणुका पटेल, प्रा. मनोजकुमार पारधी, प्रा. निलेश उमक, प्रा. गौरी श्रीरंग जकाते, प्रा. मीना चौधरी, प्रा. प्रीती आळे, प्रा. मयुरी पोकळे, प्रा. प्रीती वानखडे, प्रा. तेजश्री देशमुख, प्रा. नामदेव डहाके, प्रा. नरेंद्र भटकर, प्रा. संदीप भटकर, प्रा. रवि चव्हाण, प्रा. उमेश वाठ, प्रा. प्रमोद कराळे, प्रा. दिनेश मेश्राम, प्रा. दिनेश देशमुख, डॉ. अलविना हक, डॉ. राजेश पाटील, प्रा. मंगेश मसराम, प्रा. संजय गजभिये, प्रा. सोनल चांडक, प्रा. चंचल टावरी, प्रा. ममता यादव, प्रा. नीलम अंबुलकर, नितीन बोरेकर, आशिष कावरे, विनोद गुहे, हर्षद रेवणे, संदीप कांबळे, मंगेश इंगोले, विक्रांत कुयरे, मनोज डहाके, रुपेश कळसकर, दिनेश टेकाम, पवन हिंगणे, उमेश ढोणे, अविनाश काळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


