पुणे शहरात भटक्या कुत्र्यांसाठी विशेष रेबीज लसीकरण मोहीम

जागतिक रेबीज दिनानिमित्त महापालिकेचा उपक्रम; १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र वाहने

पुणे, राजन शेळके ( प्रतिनिधी ) : जागतिक रेबीज दिनानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी विशेष रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या जागतिक रेबीज दिनाची अधिकृत संकल्पना ‘स्ट्रॉगर टूगेदर’ अशी आहे.

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनांसोबत कुत्रे पकडणारे कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि रेबीज लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय दोन डिजिटल वाहने तसेच पाच परिमंडळांसाठी पाच निरीक्षण वाहने उपलब्ध आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र पाच वाहनेही कार्यरत आहेत.

डब्ल्यूव्हीएस वर्ल्ड व्हेटरनरी सर्व्हिसेस संस्थेच्या माध्यमातून महापालिका कर्मचारी, अधिकारी, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, माहितीपत्रके आणि जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी रेबीजविषयी जनजागृती करण्यात येत असून, कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाची काळजी, रेबीजचा धोका आणि प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…