नागपूर,सतीश तोडासे ( प्रतिनिधी) : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजल आत्माराम ढेलकर (वय 19, रा. गंजिपेठ, फायरब्रिगेड ऑफिसजवळ, मालदारपुरा, पोलीस ठाणे गणेशपेठ, नागपूर शहर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा, 1951 च्या कलम 56(1)(ब) अन्वये तडीपार आदेश काढण्यात आला होता.
तडीपार आदेश क्रमांक 29/2026, दिनांक 21 सप्टेंबर 2026 ची नियमानुसार बजावणी करून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित इसमास नागपूर शहराच्या हद्दीतून हद्दपार करून मध्य प्रदेशातील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडले. ही कारवाई लकडगंज पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून करण्यात आली असून, कारवाईचे छायाचित्रे पोलिसांकडून जोडण्यात आले आहेत.


