प्रधानमंत्री अभ्युदय जनजाती योजनेंतर्गत युवक-युवतींसाठी उद्योजकता प्रशिक्षण

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : प्रधानमंत्री अभ्युदय जनजाती योजना अंतर्गत मातंग समाजातील युवक-युवतींसाठी अनुलोमतर्फे कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन सोहळा २८ सप्टेंबर २०२६ रोजी पेमराज सारडा महाविद्यालय येथे पार पडला.

स्पर्धात्मक युगाची गरज लक्षात घेऊन युवक-युवतींना पर्यटनाशी संबंधित प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती अनुलोमचे अहिल्यानगर भाग जनसेवक अमोल अवस्थी यांनी दिली. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य राजश्री शाहू पुरस्कार विजेते चंद्रकांत काळोखे, सुनंदाताई आदिक, पुणे विभाग प्रमुख अनुलोम सुरेंद्र बोराटे, भटके-विमुक्त विकास मंचचे सुहास पाथरकर तसेच पुरस्कार विजेते पोपटराव पठारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अनुलोम उपविभाग प्रमुख दीपक रोहकाले, प्रियंकाताई बेरड, अहिल्यानगर भाग जनसेवक अमोल अवस्थी, राम भालसिंग, गणेश मोरे, पृथ्वीराज तांबे, प्रसाद तोटे, अनुलोम मित्र ॲड. विशाख वैद्य, पांडुरंग घोरपडे, महिला संवादिनी सविता घुमरे, संगीता टेमक यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यानंतर स्वागत समारंभ व प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचा समारोप भाग जनसेवक प्रसाद तोटे यांनी आभार मानून केला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…