सरस्वती विद्यालयात आंतरशालेय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश

नागपूर, अनघा पेंडके (प्रतिनिधी ) : शंकरनगर येथील सरस्वती विद्यालय हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने २६ सप्टेंबर २०२६ रोजी ३८ वी सौ. पद्माताई बर्धन स्मृती आंतरशालेय विज्ञान वक्तृत्व स्पर्धा आणि ९ वी श्री. ए. सुंदरेसन स्मृती आंतरशालेय विज्ञान वक्तृत्व स्पर्धा उत्साहात आयोजित करण्यात आली. दोन्ही स्पर्धांमध्ये प्रत्येकी ३० शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विज्ञान वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञान, आत्मविश्वास, संवादकौशल्य तसेच समकालीन वैज्ञानिक विषयांवरील विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली. ३८ वी सौ. पद्माताई बर्धन स्मृती आंतरशालेय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत सरस्वती विद्यालय, शंकरनगर येथील कु. जागृती सतीश शेळके हिने ७६.५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे विद्यालयाला विजेतेपदाचा चषक मिळाला. श्री. पकवासा गुजराती गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कु. निधी इंदल झा हिने ७६ गुणांसह द्वितीय, तर जे. एन. टाटा पारशी गर्ल्स हायस्कूल, नागपूरच्या कु. ख्याती मनीष गुप्ता हिने ७५ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

समाधान पारितोषिकांमध्ये श्री कॉन्व्हेंट अँड हायस्कूलच्या कु. सान्वी सुशील शोलीचांदे हिने ७० गुण, तेजस्विनी विद्या मंदिर हायस्कूल, नागपूरच्या कु. डेजींग विवेक टक्कामोरे हिने ६९ गुण आणि पं. बच्छराज व्यास इंग्लिश मीडियम स्कूलच्या कु. निधी नितीन कटकर हिने ६८ गुण मिळविले. ९ वी श्री. ए. सुंदरेसन स्मृती आंतरशालेय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत सरस्वती विद्यालयाच्या कु. सान्वी योगेश पोरेडिवार हिने ८० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयासाठी विजेतेपदाचा चषक मिळविला. सेंट जॉन्स हायस्कूलच्या कु. सृष्टी ज्योतीरमणी हिने ७८ गुणांसह द्वितीय, तर जे. एन. टाटा पारशी स्कूलच्या कु. अनन्या योगेश बैस हिने ७७ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेतील समाधान पारितोषिके आदर्श विद्या मंदिर हायस्कूलच्या मास्टर मनमीतसिंग बलबीरसिंग परदार (७५ गुण), आदर्श विद्या मंदिर, सी.ए. रोडच्या कु. हिमांशी विनोद येरपुडे (७५ गुण), सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कु. वैशाली पुष्पेंद्र मिश्रा (७४ गुण) आणि श्री कॉन्व्हेंट हायस्कूलच्या कु. संबोधी गुणवंत भासमे (७३ गुण) यांनी मिळविली. स्पर्धेचे परीक्षण निवृत्त भौतिकशास्त्र प्राध्यापक तथा प्रियदर्शिनी नॉलेज सेंटर, नागपूरचे प्रमुख डॉ. संजय डी. जैन, हिस्लॉप कॉलेज, नागपूर येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. प्रतीक ई. पी. मायकेल आणि हिस्लॉप कॉलेजच्या जैवरसायनशास्त्र व संशोधन केंद्राच्या विभागप्रमुख तथा सहयोगी प्राध्यापिका डॉ. माशिथा पिसे यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. टी. के. वेंकटेश यांच्या हस्ते झाले. साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. व्ही. मीनाक्षी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सौ. माधुरी इनुमुला आणि श्री. श्रेयस पिंगळे यांनी स्पर्धेचे संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली. विद्यालय व्यवस्थापन, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाने विजेत्या विद्यार्थ्यांसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि अध्ययनाची भावना अधिक बळकट झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…