जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बँकेची भूमिका महत्त्वाची

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभासद तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेत बँकेच्या कामकाजाचा आढावा, सहकार क्षेत्रातील विविध उपक्रम, तसेच सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणे तसेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी बँकेच्या उपाध्यक्ष डॉ. मीनल पाटील खतगावकर, संचालक बी. आर. कदम, माधवराव पाटील जवळगावकर, श्रीनिवास चव्हाण, कैलास देशमुख गोरठेकर, मारोतराव कवळे गुरुजी, कृष्णा पाटील आष्टीकर, अनिल पाटील बाभळीकर, सौ. संगीता विठ्ठल पाटील डक, सौ. प्रणिताताई देवरे, सौ. सुशिलाबाई बेटमोगरेकर यांच्यासह सर्व संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम तसेच बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…