गणपती उत्सवात मुंजोबा युवा मंडळाने केले भागवत कथेचे आयोजन

भागवताचार्य ह.भ.प. रामचंद्र महाराज दरेकर यांनी केले कथा निरूपण

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर शिंदेवाडी येथील तरुणांनी गणपती उत्सवात अन्य कोणतेही कार्यक्रम न करता भारतीय अध्यात्म तत्त्वज्ञानाचा गाभा असलेल्या श्रीमद्भागवत कथेचे आयोजन केले. तरुण वर्गाने कथा श्रवणातून अध्यात्म समजून घेण्याचा प्रयत्न केला.

प.पू. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज यांच्या समाधी स्थळाने पुनीत झालेले श्रीक्षेत्र सुरेगाव तसेच जवळच असलेले विसापूर व पंचक्रोशीत नेहमीच आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. गणपती उत्सव म्हटले की, तरुणांची सांस्कृतिक कार्यक्रमांकडे ओढ असते. मात्र, यावेळी विसापूर शिंदेवाडी येथील मुंजोबा युवा मित्र मंडळाने श्रीगणपती स्थापना काळात अध्यात्म समजून घेण्यासाठी श्रीमद्भागवत कथेचे आयोजन केले.

परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमात कथा श्रवणाचा लाभ घेतला. ह.भ.प. रामचंद्र दरेकर महाराज यांच्या ओघवत्या वाणीतून कथा संपन्न झाली. काल्याच्या कीर्तनाने दिनांक २४ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाची सांगता झाली. मुंजोबा युवा मंडळाचे अनिलराव शिंदे, शरद भाऊ शिंदे, चांगदेव शिंदे, निलेश जठार यांच्यासह मुंजोबा युवा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

Ladki Bahin Yojana : लाडकी बहनों को फिर मिलेंगे ₹1500? 81 लाख महिलाओं के लिए बड़ी खबर!

महाराष्ट्र की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का लाभ लेने वाली महिलाओं के लिए राहत भरी खबर सामने आई है। KYC पूरी नहीं होने के कारण योजना की आर्थिक सहायता…

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…