नांदेडमध्ये जमीन व्यवहाराच्या नावाखाली 11.85 कोटींचा महाघोटाळा

बनावट कागदपत्रांच्या आधारे 35 नागरिकांची फसवणूक; तिघांना अटक

नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेडमध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली तब्बल 11 कोटी 85 लाख रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. मौजे मेंढला खुर्द येथील गट नंबर 73 मधील जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगून आरोपींनी बनावट सातबारा आणि रजिस्ट्रीची कागदपत्रे तयार केली. या प्रकरणात आतापर्यंत 35 नागरिकांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

जानेवारी 2026 मध्ये कापड व्यावसायिक देवेंद्र शर्मा यांना विश्वासात घेऊन 1 कोटी 26 लाख रुपयांचा जमीन व्यवहार ठरवण्यात आला. एकादशी हॉटेलमध्ये सौदा चिट्ठी करून त्यांच्याकडून 35 लाख रुपये रोख घेण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याच जमिनीची इतर नागरिकांनाही विक्री करण्यात आली. अशाप्रकारे तब्बल 35 जणांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. फिर्यादीने पैसे परत मागितल्यानंतर आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वजीराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 226/2026 दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तपास SDPO रामेश्वर वैजने यांच्याकडे सोपवला. तपासादरम्यान या टोळीने आतापर्यंत 35 नागरिकांची तब्बल 11 कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

या टोळीत स्थानिक प्रॉपर्टी डीलर आणि दलालांचाही समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी राहुल गायकवाड याच्यावर यापूर्वीच 12 दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी राहुल गायकवाड, जखाजी ऊर्फ बंडू पावडे आणि अमोल मालेगावकर या तिघांना अटक केली आहे. सध्या दोन आरोपी पोलिस कोठडीत असून, एका आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना महसूल विभागाकडून 7/12 उतारा, फेरफार आणि मूळ मालकीची पूर्ण खात्री करून घ्यावी. केवळ खासगी सौदा चिट्ठी किंवा दलालांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून व्यवहार करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

दयाल नगर की मातारानी मंडल में भव्य पाठ-पूजा एवं अर्चना कार्यक्रम संपन्न

वर्धा ,  किशोर सोनी  ( प्रतिनिधि ) : वर्धा शहर के दयाल नगर स्थित मातारानी मंडल में देवी माता के पावन पाठ, पूजा एवं अर्चना का भव्य धार्मिक कार्यक्रम श्रद्धा…

महिलाओं के लिए ST सफर में बड़ी सुविधा, राज्यभर में बनेंगे 125 ‘हिरकणी कक्ष’

महाराष्ट्र की ST बसों से हर दिन सफर करने वाली महिलाओं के लिए एक अहम सुविधा शुरू होने जा रही है। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल (MSRTC) ने टोयोटा किर्लोस्कर…