जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सोनखेडचा रास्ता रोको रद्द; शेतकऱ्यांचा प्रशासनावर विश्वास

नांदेड , रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन व हळद पिकांना 100 टक्के पीकविमा नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार, दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कलंबर फाटा, सोनखेड येथे आयोजित करण्यात आलेला रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय शेतकऱ्यांनी रद्द केला आहे.

सोनखेड परिसरातील सोयाबीन व हळद पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यानंतर सोनखेडचे पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर रास्ता रोको आंदोलन करू नये, अशी विनंती केली. याबाबत एपीआय नागरगोजे यांनी शेतकऱ्यांना पत्रही दिले. या आश्वासनाचा सकारात्मक विचार करून सोनखेड परिसरातील शेतकरी व शेतकरी प्रतिनिधींनी एकत्रित चर्चा केली आणि दि. 15 सप्टेंबर रोजी कलंबर फाटा, सोनखेड येथे होणारा रास्ता रोको रद्द करण्याचा सामूहिक निर्णय घेतला.

या निर्णयामध्ये प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर, शंकरराव मोरे, शेतीनिष्ठ शेतकरी एकनाथराव मोरे, गजानन मोरे, माधवराव देसाई, रघुनाथ मोरे, आनंदराव मोरे, रमेश मोरे, लिंगोजीराव हरबळकर, भागवतराव मडकीकर, त्र्यंबकराव पाटील जानापुरी, खुशाल पाटील दगडगावकर, नागोराव दगडगावकर, प्रकाश मालक जवळेकर, गजेंद्रराव बोरगावकर, कदम बोरगावकर, प्रकाश शिंदे पळशीकर, गजाननराव अलर्ट हरसदकर, अ‍ॅड. दत्तारावजी हांडे, रत्नाकर शिधापूरे, टोपाजी धुतराज, किसनराव शिंदे, पंढरी पाटील येवले, भागवत हांडे पिंपळगावकर, सुदामराव मोरे, अर्जुन ठाकूर यांच्यासह सोनखेड परिसरातील इतर अनेक शेतकरी सहभागी होते.

शेतकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन रद्द केले असले तरी कोरडा दुष्काळ जाहीर करणे, सोयाबीन व हळद पिकांना 100 टक्के पीकविमा नुकसानभरपाई देणे आणि चारा छावण्या सुरू करणे या मागण्या कायम असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन प्रशासनाने गांभीर्याने पूर्ण करून शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा सोनखेड परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

परतीचा पाऊस न आल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची शेतकऱ्यांची मागणी

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झालेली असून कुकडी व घोड प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे. परंतु पावसाची फक्त…

वरदविनायक मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोतुळ तालुका अकोला येथील प्राचीन व नवसाला पावणाऱ्या श्री वरदविनायक देवस्थानात श्री गणपती बाप्पाच्या आगमना निमित्ताने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे…