नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : येथील वर्कशॉप पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘ग्रंथ चौक’ असे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन ज्येष्ठ प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा. अशोक चव्हाण यांना दिले.
या शिष्टमंडळात डॉ. भगवान अंजनीकर, सी.आर. पंडित, भीमराव राऊत, प्रा. नारायण शिंदे, पंडित पाटील, राजेंद्र हंबीरे, संजय पाटील, शिवाजी हंबीरे सहभागी झाले होते. या मागणी पत्रावर प्रा. दत्ता भगत, डॉ. जगदीश कदम, प्रा. सु.मा. कुलकर्णी, आशा पैठणे, डॉ. भीमराव हटकर, सतीश कुलकर्णी, दत्ता डांगे, रवींद्र तांबोळी आदी साहित्यिक आणि साहित्यप्रेमी नागरिकांच्या सह्या आहेत.
खा. अशोक चव्हाण यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेडच्या वैभवशाली परंपरेत भर पडेल, अशी आशा निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे


