ऑलिम्पिक असोसिएशनच्या क्रीडा संकुलासाठी जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आश्वासन; १७ सप्टेंबरला पालकमंत्री अतुल सावे यांच्यासोबत होणार चर्चा

नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या क्रीडा संकुलासाठी जागेचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित कायम अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदनही देण्यात आले. निवासी जिल्हाधिकारी आंबेकर यांचीही यावेळी उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यात जिल्हा व विभागीय क्रीडा संकुल उपलब्ध नसल्याने खेळाडूंना सराव तसेच क्रीडा क्षेत्रातील शैक्षणिक तयारीसाठी आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नांदेडच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून पदके मिळवली आहेत. मात्र, आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या क्षमतेला मर्यादा येत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार २ ऑक्टोबरपर्यंत क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध न झाल्यास पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची तयारी असल्याचे ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव बालाजी पाटील जोगदंड यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले.

यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी, “तशी वेळ येणार नाही. येत्या १७ तारखेला नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि यावर मार्ग काढू,” असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वासनामुळे शिष्टमंडळाचे समाधान झाले असून, सर्वांनी त्यांचे आभार मानले. त्यामुळे नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. उपस्थित: उपाध्यक्ष तुकाराम रामनबैनवाड, महासचिव बालाजी पाटील जोगदंड, कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी, ऑलिम्पिकचे मार्गदर्शक तथा नांदेड जिल्हा माजी क्रीडा अधिकारी गंगारामजी यादव, सदस्य राष्ट्रपाल नरवाडे, प्रशांत आसमाने आदी.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…