भारतीय कृषी विद्यालय, गोकुळ कॉन्व्हेंट व आदर्श प्राथमिक शाळेत तान्हा पोळा उत्साहात

नागपूर : भारतीय कृषी विद्यालय, गोकुळ कॉन्व्हेंट व आदर्श प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या नंदीबैलांच्या प्रतिकृती घेऊन उत्सवात सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बालगोपालांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी भारतीय कृषी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रजनी पेंदाम यांनी नंदीबैलांची पूजा केली. तसेच शेतकरी आणि बैलांचे नाते व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, ग्रामीण परंपरा आणि कृषी संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. उत्कृष्ट सजावट केलेल्या नंदीबैलांच्या प्रतिकृतींना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळेचे पर्यवेक्षक विनोद पवार, मनोज महल्ले, संगीता वडस्कर, डायरे मॅडम, कॉन्व्हेंटच्या शिक्षिका सरिता वाघमारे, श्रद्धा धपके, भाग्यश्री मेश्राम, सारिका फाले, विधी खडसे, सपना सिंग, श्री. विक्रम बोन्दरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तान्हा पोळा उत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. बाळासाहेब पन्नासे, सचिव राकेशभाऊ पन्नासे, सहसचिव अखिलेश पन्नासे, कोषाध्यक्षा सौ. प्रज्ञाताई पन्नासे, अर्चना पन्नासे व सर्व संचालक मंडळाने कौतुक व अभिनंदन केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…