मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

जात पडताळणीची १६ हजारांहून अधिक प्रकरणे निकाली; ५७ लाख नोंदी संकेतस्थळावर उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख १६ हजार ९७७ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जात पडताळणीसाठी प्राप्त २१ हजार ५१ अर्जांपैकी १६ हजार ११० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ही माहिती मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांत प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत ३ लाख १६ हजार ९७७ प्रमाणपत्रांचे वाटप झाले असून, १० टक्के आरक्षणाच्या अनुषंगाने २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. जात पडताळणीच्या प्रक्रियेत २१ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १६ हजार ११० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, केवळ ६४ प्रकरणे नामंजूर झाली आहेत. उर्वरित प्रकरणांवरही नियमानुसार कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, जुन्या अभिलेखांमधून शोधण्यात आलेल्या ५७ लाख नोंदी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरापर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठवाडा दौरा ७ सप्टेंबरपासून सुरू असून, विभागातील प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाहीचा आढावा घेतला जात आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू असून, अर्जांबाबत महाधिवक्त्यांचे कायदेशीर मत घेण्यात येणार आहे. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्याबाबतही शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे डॉ. सामंत यांनी सांगितले. मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकणारे आरक्षण देताना संविधानिक व न्यायिक चौकटीचे पालन करण्यात येईल. तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्या हक्कांना धक्का लागू नये, याची दक्षता घेतली जात असल्याचेही मंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…