ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर,उज्वल रोकडे ( प्रतिनिधी ) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर, सचिव वसंतरावजी इझनकर आणि कार्यकारी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम ३० ऑगस्ट २०२६ रोजी हनुमान मंदिर सभागृह, अमरनगर, नागपूर येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी गणपतराव निंबाळकर, सौ. ज्योती निंबाळकर, श्री. रामेश्वर कांबळे, रामकृष्ण बांगडे, विजय लांजेवार, सौ. प्रांजली चांगदे, मोहन धवल, रामभाऊ चव्हाण, चंद्रभान खोडे, सौ. रेखा बोबडे, अशोक सांभारे, सौ. कल्पना बांगडे आणि संजय अस्वले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रभागाचे नगरसेवक बाबाराव तायडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणपतराव निंबाळकर, धनराज भोयर, रमेश जिल्हारे, ॲड. अरमरकर, श्री. कोहाड, राजेश कुऱ्हाडे, सौ. शोभा आगरकर, दत्तात्रय उदापुरे, सरिता धनजोड, सौ. जया रासेकर आणि सौ. मालती गौरखेडे, सौ. रेखा काठीकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सौ. गौरखेडे, सौ. भोयर, सौ. ज्योती निंबाळकर, शेषराव ठाकरे, देवानंद दुधे, गौतम वरघट, धनराज भोयर, प्रकाश गोजे यांच्यासह मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…