आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना खासदार-आमदारांकडून तंबी

नांदेड, रवींद्र ओंढेकर ( विशेष प्रतिनिधी ) : गेल्या २० ते २५ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाण्याची व्यवस्था केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा अखंडित ठेवावा तसेच ट्रान्सफॉर्मरसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार व आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण व जिल्हा प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक पार पडली. यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, गोविंदराव शिंदे नागेलीकर, वसंत सुगावे आणि राहुल कर्डिले आदी उपस्थित होते.

बैठकीत महावितरणकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. महावितरणकडून शेतकऱ्यांकडून वारेमाप पद्धतीने वीजबिलाची वसुली केली जाते; मात्र त्या तुलनेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याबद्दल उपस्थित लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. तसेच तालुकानिहाय व विभागनिहाय उपलब्ध ट्रान्सफॉर्मरची संख्या, विविध भागांत सुरू असलेली कामे, मनुष्यबळाची उपलब्धता आणि वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…