वाढदिवसाचा आदर्श वस्तुपाठ; अमित बाबूडकर यांनी समाजसेवेतून जिंकली मने

गोसेवा, अन्नदान, वृक्षारोपण, ज्येष्ठांना आधार आणि वाचनसंस्कृतीला बळ

तिवसा, राज माहोरे  (प्रतिनिधी) : आजच्या काळात वाढदिवस म्हणजे केक, फटाके आणि दिखाऊ खर्च अशी संकल्पना रूढ होत असताना भाजपा नेते अमित बाबूडकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला. “वाढदिवस माझ्यासाठी नाही, तर समाजासाठी” हा संदेश देत त्यांनी तिवसा आणि अमरावती परिसरात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले.

वाढदिवसानिमित्त केकतपूर येथे गोमातेला हिरवा चारा व अन्नदान करण्यात आले. त्यानंतर अमरावती येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत भोजन केले. पर्यावरण संवर्धनासाठी तिवसा शहरातील प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. तसेच गरजू व ज्येष्ठ नागरिकांना आधार काठीचे वाटप करण्यात आले.

ज्ञानदानाच्या उद्देशाने श्री स्वामी विवेकानंद बहुविषयीय सामाजिक संस्था तथा राजर्षी शाहू महाराज वाचनालय, तिवसा येथे दहा पुस्तकांची भेट देण्यात आली. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि युवकांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. यावेळी वाचनालयाच्या वतीने अमित बाबूडकर यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन, गोसेवा, ज्येष्ठांचा सन्मान आणि ज्ञानदान यांचा संगम घडवून अमित बाबूडकर यांनी वाढदिवसाचा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्या या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…