प्रामाणिक ऑटोचालकाने सापडलेली सुमारे ₹4.75 लाखांची बॅग महिलेच्या स्वाधीन केली

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी )  : पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी ममता नरेश यादव, व्यवसाय – शासकीय शिक्षिका, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, प्लॉट क्र. 205, यादव नगर, यांनी तक्रार दिली होती. त्या जुना मोठा स्टँड चौक, अमर टॉकीजसमोर खरेदीसाठी गेल्या असता त्यांची बॅग हरवली होती.

सदर बॅगेमध्ये रोख रक्कम ₹1,75,000/-, दीड तोळ्याची सोन्याची अंगठी अंदाजे किंमत ₹2,50,000/-, मोबाईल फोन अंदाजे किंमत ₹50,000/- तसेच 03 एटीएम/डेबिट कार्ड असा एकूण सुमारे ₹4,75,000/- किमतीचा मुद्देमाल होता. सदर घटनेबाबत पोलीस ठाणे लकडगंज येथे तपास सुरू असताना, दिनांक 01 सप्टेंबर 2026 रोजी रिक्षाचालक सचिन मोतीरामजी निखारे, वय 40 वर्षे, व्यवसाय – ऑटो रिक्षाचालक, रा. विनोबा भावे नगर, गांधी पुतळा गल्ली क्र. 10, फ्लॅट क्र. 13, नागपूर यांना सदर बॅग व त्यातील मुद्देमाल मिळून आला. सचिन निखारे यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे सदर बॅग पोलीस ठाणे लकडगंजच्या माध्यमातून संबंधित महिला ममता यादव यांच्याकडे सुरक्षितपणे परत केली. त्यामुळे महिलेचा सुमारे ₹4.75 लाखांचा मुद्देमाल त्यांना परत मिळाला.

सचिन निखारे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षतेबद्दल पोलीस ठाणे लकडगंजच्या वतीने त्यांचा सत्कार करून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. नागरिकांनीही अशाच प्रकारे प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस ठाणे लकडगंज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…