हिरवाईने नटला नांदेड–भोकर मार्गावरील सीताखंडी परिसर…

नांदेड , रविन्द्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी )  :  पावसाळ्याच्या आगमनाने नांदेड–भोकर रोडवरील सीताखंडी परिसराने हिरवाईची शाल पांघरली आहे. डोंगररांगांवर पसरलेली दाट हिरवळ, त्यावर अलगद विसावलेले ढग आणि काळ्याभोर आभाळातून बरसणाऱ्या पावसाची चाहूल… निसर्गाने जणू या परिसराला नव्याने सजवले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा फुललेली वनराई, हिरव्यागार टेकड्या आणि पावसाळी वातावरणात खुलून दिसणारे निसर्गरम्य दृश्य मनाला सुखावून जाते. वाटसरूंचे लक्ष वेधून घेणारा हा परिसर सध्या निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक सुंदर ‘फोटो फ्रेम’ ठरत आहे.

हिरवाईच्या कुशीत उभारलेले छोटेसे निवांत ठिकाण, रंगीबेरंगी छत्र्या आणि पार्श्वभूमीला डोंगररांगांवर दाटलेले ढग—या साऱ्यांनी सीताखंडीच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. पावसाच्या सरींनी धुतलेला निसर्ग आणि ढगांच्या सावलीत चमकणारी हिरवाई, क्षणभर का होईना, धावपळीच्या जगापासून दूर घेऊन जाते. सीताखंडीचा हा पावसाळी निसर्ग म्हणजे हिरवाई, ढग आणि डोंगर यांचा मनमोहक संगम…

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…