सूर्यभान तुकाराम गोसावी यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :  अकोले तालुक्यातील परखतपूर येथील रहिवासी तथा दशोनाम गोसावी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. सूर्यभान तुकाराम गोसावी यांना ‘दशोनाम गोसावी समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दशोनाम गोसावी समाज परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बीड येथे आयोजित महाअधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातील एकता, शिक्षण, संस्कृती, समाजजागृती तसेच समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

गोसावी यांनी समाजातील युवकांना शिक्षण, रोजगार व व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यासोबतच गरजू व ज्येष्ठ नागरिकांना मदत, शैक्षणिक व वैद्यकीय सहकार्य, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच समाजातील एकता व बंधुभाव वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. समाजाच्या प्रगतीसाठी आयुष्य समर्पित करून कार्य करणाऱ्या  सूर्यभान तुकाराम गोसावी यांच्या या सन्मानाबद्दल विजय गोसावी, बाबासाहेब गोसावी, विशाल गोसावी, दत्तात्रय गिरी, माजी सरपंच राजेंद्र वाकचौरे, अविनाश देशमुख आदींनी अभिनंदन केले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…