‘महापौर निवास’ नाम ही रहे कायम, ‘रामदूत’ प्रस्ताव का पूर्व महापौरों ने किया विरोध

2002 से प्रचलित नाम बदलने पर पुणे शहर माजी महापौर संघटना ने जताई नाराजगी

पुणे : घोले रोड स्थित पुणे महानगरपालिका के महापौर निवास का नाम बदलकर ‘रामदूत’ रखने के प्रस्ताव का पुणे शहर माजी महापौर संघटना ने तीव्र विरोध किया है। संघटना ने मांग की है कि वर्षों से प्रचलित ‘महापौर निवास’ यह नाम कायम ठेवण्यात यावे. महापौरांना शहरातील कामकाजासाठी निवासस्थान उपलब्ध असावे, यासाठी पुणे महानगरपालिकेने घोले रोड येथे दुमजली निवासस्थान बांधले होते. त्यावेळी या निवासस्थानाला ‘महापौर निवास’ असे नाव देण्यात आले. 2002 पासून हे निवासस्थान याच नावाने ओळखले जाते.

आता या बंगल्याचे नाव बदलून ‘रामदूत’ करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रस्तावामुळे पुणे शहर माजी महापौर संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. ‘महापौर निवास’ हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या प्रशासकीय आणि राजकीय परंपरेशी जोडले गेले आहे. त्यामुळे केवळ नाव बदलण्याची गरज नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

याबाबत पुणे शहर माजी महापौर संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी महापौर मंजूषा नागपुरे यांना पत्र दिले आहे. या पत्राद्वारे ‘महापौर निवास’ हेच नाव कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. घोले रोडवरील हे निवासस्थान अनेक वर्षांपासून पुण्याच्या महापौर पदाशी जोडलेले आहे. त्यामुळे या वास्तूचे नाव बदलण्याऐवजी ‘महापौर निवास’ ही ओळख कायम ठेवावी, अशी भूमिका माजी महापौर संघटनेने घेतली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा…

ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच…