MPSC औषध निरीक्षक भरतीवर पेपरफुटीचे सावट? 90 प्रश्न आधीच व्हायरल झाल्याचा विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप

WhatsApp वर प्रश्न फिरल्याचा दावा; MPSC कडून पेपरफुटी नाकारली, चौकशीसह अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

MPSC Drug Inspector Exam Paper Leak : देशभरात नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न WhatsApp वर व्हायरल झाल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला असून, संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदार उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर फिरणारे अनेक प्रश्न आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये साम्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय, नंदुरबारमधून परीक्षेतील प्रश्न पुढे पाठवण्यात आल्याची चर्चा देखील समोर आली आहे. सुमारे 90 प्रश्न परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

MPSC चे स्पष्टीकरण

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पेपरफुटीचे आरोप फेटाळून लावले आहेत. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाली असून तिची पडताळणी केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने सांगितले की, प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळले नाही तर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

इंतजार खत्म! NEET UG 2026 का रिजल्ट जारी, आर्यन गुप्ता और पंशुल बंसल बने देश के टॉपर

नई दिल्ली : देशभर के लाखों मेडिकल अभ्यर्थियों का इंतजार आखिरकार खत्म हो गया। नेशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने NEET UG 2026 का परिणाम घोषित कर दिया है। इस साल…

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…