वृत्तपत्र विक्रेते श्रीकांत मेरगू यांचा सत्कार

अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) :  पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात गेल्या १८ वर्षांपासून वृत्तपत्र व फुले विक्रीचा व्यवसाय करणारे श्रीकांत मेरगू यांचा ३५ वा वाढदिवस श्रीराम चौक मॉर्निंग ग्रुपच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

मेरगू हे भल्या पहाटे वृत्तपत्र विक्रीसाठी श्रीराम चौकात येतात. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह नियमित वाचकांना सकाळीच वृत्तपत्रे उपलब्ध होतात. त्यांच्या या नियमित आणि सेवाभावी कार्याची दखल घेत ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य निवृत्त मुख्याध्यापक किसनराव गांगर्डे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार कोणतीही पूर्वकल्पना न देता मेरगू यांचा सत्कार करून त्यांना सुखद धक्का देण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापक ठकाजी टकले यांच्या हस्ते मेरगू यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निवृत्त विस्ताराधिकारी पोपट धामणे म्हणाले, “वाचकांना नियमित आणि वेळेत वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्याबरोबरच इतरांच्या आनंदासाठी फुले विकणारे श्रीकांत मेरगू हे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असलेले कर्मयोगी आहेत. अशा कष्टकरी व्यक्तींचा सार्वजनिक सन्मान त्यांच्या कार्याला निश्चितच बळ देणारा आहे.”

“अशा अनपेक्षित पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्याने मन भारावून गेले,” अशी भावना श्रीकांत मेरगू यांनी व्यक्त केली. श्रीराम चौक मॉर्निंग ग्रुप हा ज्येष्ठ नागरिकांचा समूह असून सामाजिक बांधिलकी जपत विविध सकारात्मक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो. यावेळी भूमैय्या ताटी, निवृत्त मुख्याध्यापक किसनराव गांगर्डे, सुभाष दारकुंडे, भिकाजी गावडे, भालसिंग गुरुजी, नंदकिशोर पाठक, रावसाहेब गांगर्डे, मगन सोनवणे, मारुती फुलारी, प्रगतिशील शेतकरी कैलास नाकाडे, गोकुळ जायभाय, रमेशराव भुजबळ, महादेव देवकर, चंद्रकांत वराडे, श्री नक्का, श्री शीरकूळ, भरत महाराज साबळे, बाळू काटकर, राकेश घोडके आदी उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हरे रामा हरे कृष्णाच्या तालावर थिरकले नागपूरकर!

नागपूर : डीजेचा दणदणाट नाही, फिल्मी गाण्यांचा जल्लोष नाही… त्याऐवजी ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या भक्तिमय गजरात थिरकले नागपूरकर! तिरंगा चौकात विवेकानंद जनजागृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली नागपूर शहरातील पहिली अध्यात्मिक…

मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

भंडारा, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : भंडारा डोंगर-जांभवडे, इंदोरी येथे मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने १ हजार देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब,…