अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : कल्याण रोड, गणेशनगर येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर व एस.टी. बस चालक सतीश भांबरकर यांच्या ज्येष्ठ भगिनी कु. प्रमिला भांबरकर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी सांत्वनपर भेट घेतली.
स्व. कु. प्रमिला भांबरकर यांनी डॉ. देशपांडे व डॉ. तांबोळी हॉस्पिटलमध्ये २५ वर्षे नर्स म्हणून सेवा केली. आरोग्य सेवेच्या कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यावेळी शंकर गायकर म्हणाले, “सेवा परमो धर्म, मनुष्य सेवा करणे हाच खरा धर्म आहे. या प्रमाणे सेवाभाव वृत्तीने आरोग्य सेवेचे केलेले कार्य महान आहे. स्वर्गीय प्रमिला भांबरकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भांबरकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो.”
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे मंदिर अर्चक पुरोहित संपर्क आयामाचे विभाग प्रमुख गजेंद्र सोनवणे, भारतीय मजदूर संघाचे प्रदीप भाटे, मयूर राजपुरोहित, मंदिर अर्चक पुरोहित आयामाचे सहप्रमुख हरिभाऊ डोळसे, निसर्गसृष्टी गौशाळेचे गौतम कराळे, सुरेंद्र सोनवणे, भाजपचे मुकुल गंधे, भारतीय किसान संघाचे जिल्हाप्रमुख निलेश चिपाडे आदी उपस्थित होते.


