विशेष मुलांसाठी साऊंड हीलिंग व ध्यान सत्राचे आयोजन

नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी): Ma Iraa Healings आणि Lions Club of Nagpur Metropolitan यांच्या संयुक्त विद्यमाने मातृसेवा संघ, नागपूर येथील विशेष मुलांसाठी साऊंड हीलिंग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले.

हे सत्र Ma Iraa Healings च्या संस्थापक, DC Yoga Meditation व Lions Club सदस्य पियू लाहोरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या सत्रात शाळेच्या प्राचार्या मृणालिनी मॅडम तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांसोबत उत्स्फूर्त सहभाग घेतला. ध्वनी, संगीत आणि ध्यानाच्या माध्यमातून मुलांना शांतता, सकारात्मकता आणि आनंदाचा अनुभव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या वेळी Ma Iraa Healings टीमचे सारंग खोडे आणि अपूर्वा खोडे उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…