‘रिदम डिवाइन डान्स स्टुडिओ’तर्फे भव्य ‘गरबा नाइट २०२६’चे आयोजन; ४०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, आशिष औंढेकर ( प्रतिनिधी ) :  रिदम डिवाइन डान्स स्टुडिओच्या संचालिका वर्षा आणि वंदना चौरसिया यांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसांच्या यशस्वी गरबा कार्यशाळेनंतर ११ ऑक्टोबर रोजी जय तुळजा भवानी लॉन्स, पुणे येथे ‘गरबा नाइट २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक उत्सवात ४०० हून अधिक नागरिकांनी पारंपरिक नवरात्रोत्सवाच्या पोशाखात उत्साहाने सहभाग नोंदवला.

नृत्याच्या माध्यमातून भारतीय सांस्कृतिक परंपरांना प्रोत्साहन देणे आणि समाजात एकता व आपुलकी वाढवणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे स्टुडिओच्या संस्थापक वर्षा आणि वंदना चौरसिया यांनी सांगितले. या सोहळ्यात गरबा व दांडिया सादरीकरण, समूह नृत्य, संगीत तसेच ‘बेस्ट रील’ स्पर्धेतील विजेत्यांसाठी पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.

या प्रसंगी नगरसेविका हेमलता मगर, प्राचार्य चंद्रिका बॅनर्जी, सामाजिक कार्यकर्ते नितीन सुखदेव शिंदे, श्री शितोळे आणि शैलजा यांची विशेष उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुनील भारती आणि राहुल महाजन यांनी केले. आयोजन यशस्वी करण्यासाठी नवनीत वालिया, गोविंद व हर्षा चौरसिया, नंदन चुग, ललिता मूर्ती, अंजली दिकोंडवार आणि अभय गुप्ता यांनी योगदान दिले. या आयोजनाला माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, सावीझ ब्यूटी सैलून आणि पलमोनास ज्वेलर्स यांचे प्रायोजकत्व लाभले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

Ladki Bahin Yojana : लाडकी बहनों को फिर मिलेंगे ₹1500? 81 लाख महिलाओं के लिए बड़ी खबर!

महाराष्ट्र की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का लाभ लेने वाली महिलाओं के लिए राहत भरी खबर सामने आई है। KYC पूरी नहीं होने के कारण योजना की आर्थिक सहायता…

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…