करवीर निवासिनी आई अंबाबाई सर्वस्याद्या स्वरूपात नटली

शारदीय नवरात्र महोत्सव | श्री शके १९४८ | द्वितीया तिथी

कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी) : आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या द्वितीया तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई सर्वस्याद्या स्वरूपात नटली आहे. विश्वाच्या आरंभी जेव्हा काहीही नव्हते, तेव्हा परब्रह्माने धारण केलेले पहिले सगुण साकार रूप म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई.

देवीने स्वतःच्या तमोगुणातून महाकालीला प्रकट केले, तर सत्त्वगुणातून महासरस्वतीला प्रकट केले. महालक्ष्मीने स्वतः ब्रह्मा आणि लक्ष्मीला प्रकट केले, तर महासरस्वतीने विष्णू आणि गौरीला प्रकट केले. महाकालीने भगवान शंकर आणि सरस्वतीला प्रकट केले. यानंतर या सहा जणांचे आपापसात विवाह करून त्यांना कार्य नेमून दिले. ब्रह्मा आणि सरस्वती यांनी विश्वाचे सृजन करावे, विष्णू आणि लक्ष्मी यांनी पालन करावे, तर शिव आणि गौरी यांनी संहार करावा, अशी व्यवस्था करण्यात आली. याप्रमाणे कारणपुरुषांवर विश्वाची जबाबदारी सोपवून आई जगदंबा आत्मानंदात मग्न झाली. विश्वाच्या निर्मितीनंतर भगवान विष्णूंनी जगाच्या जननीसाठी या करवीर क्षेत्राची निर्मिती करवली. तेव्हापासून आई जगदंबा या करवीर क्षेत्री निवास करत आहे.

आजही मंदिरात देवीच्या उजवीकडे महाकाली, तर डावीकडे महासरस्वती विराजमान आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या देवकोष्टात उत्तराभिमुख व्यंकटेश लक्ष्मी, पूर्वाभिमुख कात्यायनी (खरे तर ते स्थान ब्रह्मदेवाचे) तर दक्षिणाभिमुख गौरीशंकर विराजमान आहेत. संस्कृतमध्ये अंबा म्हणजे आई. करवीर निवासिनी अर्थात जगताची आई म्हणून ती अंबाबाई. ती विष्णूची पत्नी ना शिवाची, ती जगताची माता अशी सर्वस्याद्या. ही जगताची आई अंबाबाई तुम्हा-आम्हा सर्वांवर अशीच कृपा करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना.

श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…