राष्ट्रीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात पांडुरंग गायकर यांना द्वितीय क्रमांक

‘Magic of Light’ प्रकल्पातून प्रकाशाचे गुणधर्म व मानवी दृष्टीदोषांवरील उपायांचे सादरीकरण; ८६० प्रकल्पांत उल्लेखनीय यश

अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा खोडद (नारायणगाव) येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात ब्राम्हणवाडा येथील रहिवासी व नूतन विद्या मंदिर शाळेचे शिक्षक पांडुरंग भाऊ गायकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सादर केलेल्या ‘Magic of Light’ या विज्ञान प्रकल्पाला शिक्षक गटातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात यावर्षी संपूर्ण भारतातून तसेच दुबई, अमेरिका आणि कतार यांसारख्या देशांतूनही विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. ८६० विज्ञान प्रकल्पांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता. अशा मोठ्या आणि विविधांगी सहभाग असलेल्या स्पर्धेत गायकर यांच्या प्रकल्पाने शिक्षक गटातून द्वितीय क्रमांक मिळविल्याने त्यांच्या कामगिरीचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. ‘Magic of Light’ या प्रकल्पातून प्रकाशाचे विविध गुणधर्म विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजावून सांगता येतात. प्रकाशाचे परावर्तन, अपवर्तन यांसह प्रकाशाशी संबंधित विविध वैज्ञानिक संकल्पना या प्रकल्पाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मानवी डोळ्यांची रचना, दृष्टीदोष, दृष्टीदोषांची कारणे तसेच त्यावरील उपाययोजना यांचेही शैक्षणिक पद्धतीने स्पष्टीकरण करता येते.

इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील प्रकाशाच्या संकल्पना केवळ सैद्धांतिक स्वरूपात न शिकवता त्या प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवातून समजावून घेता याव्यात, या उद्देशाने हा प्रकल्प तयार करण्यात आला. त्यामुळे विज्ञान विषयातील अवघड संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक पद्धतीने समजण्यास मदत होते. शिक्षक म्हणून अध्यापनाबरोबरच विज्ञान, प्रयोगशीलता, संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करण्याचा पांडुरंग गायकर यांचा प्रयत्न या यशातून अधोरेखित झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि प्रयोगशील वृत्ती निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः नवोपक्रमशील राहणे आवश्यक असल्याचे त्यांच्या या उपक्रमातून दिसून येते.

राष्ट्रीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात मिळविलेल्या या यशाबद्दल पांडुरंग भाऊ गायकर यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणप्रेमी, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे नूतन विद्या मंदिर शाळेच्या शैक्षणिक नावलौकिकात भर पडली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाची गोडी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प प्रेरणादायी ठरला आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…