माजी मंत्री यशोमती ठाकूर, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या उपस्थितीत समर्थ लाइफकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन

तिवसा येथे आरोग्यसेवेचा नवा अध्याय; परवडणाऱ्या उपचारांचा उपक्रम ठरणार दिलासादायक

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : तिवसा येथे समर्थ लाइफकेअर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले, तर पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक हरीश इथापे यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला तिवसा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रतिभाताई गौरखेडे, भूवैकुंठ आध्यात्म गुरुकुल, गुरुकुंज मोझरीचे रवी मानव आणि तिवसा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश तळमळे यांच्यासह डॉ. स्मिता महात्मे, धनंजय महात्मे, वैभव वानखडे, डॉ. राजीव ठाकूर, सुरेशराव मेटकर, मयूर गेडाम, डॉ. भूषण बोके, डॉ. नयना बोके, डॉ. सप्तेश शिरभाते, अजिंक्य वकील, डॉ. जयेश शेकार, सचिन रहाटे, अरुणा देशमुख, ज्योती वानखडे आणि प्रमोद बोराळकर उपस्थित होते. याशिवाय विविध क्षेत्रांतील मान्यवर, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आर्थिक अडचणींमुळे उपचार थांबू नयेत!

समर्थ लाइफकेअर हॉस्पिटलचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नाममात्र शुल्कात लाखो रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय उपचारांची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाला दर्जेदार वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. त्यामुळे तिवसा शहरासह परिसरातील नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्यसेवेचा पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरते. समर्थ लाइफकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न होणार आहेत.

स्वर्गीय नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

कार्यक्रमादरम्यान स्वर्गीय नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. समर्थ लाइफकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून तिवसा व परिसरातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…