महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना ‘राजस्थान भूषण पुरस्कार’ जाहीर

पुणे, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखरजी मुंदडा यांना प्रतिष्ठित ‘राजस्थान भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राजस्थान भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष जगदीश उनेजा व उपाध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी नुकतीच महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाला भेट देऊन श्री. मुंदडा यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान केले. हा पुरस्कार पुणे येथे आयोजित विशेष सोहळ्यात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

गोसेवा व समाजसेवेचे कार्य अधिक समर्पणाने पुढे नेण्याची प्रेरणा : शेखर मुंदडा

पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना श्री. शेखर मुंदडा म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि अभिमानास्पद आहे. राजस्थानच्या भूमीच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार मुख्यमंत्री महोदय व पूज्य स्वामीजींच्या हस्ते प्राप्त होणे, हे माझे भाग्य आहे. गोसेवा व समाजसेवेच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन झालेली ही निवड आनंद देणारी आहे. हा सन्मान केवळ पुरस्कार नसून, गोसेवा आणि समाजसेवेचे कार्य अधिक समर्पणाने पुढे नेण्याची नवी प्रेरणा आहे.” ‘राजस्थान भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल श्री. शेखरजी मुंदडा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…