भारतीय कृषी विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळेमध्ये दहीहंदी उत्सव साजरा

नागपूर ( प्रतिनिधी) : गोपाल एज्युकेशन संस्था अंतर्गत भारतीय कृषी विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने शाळेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोकुल कॉन्व्हेंट व प्रायमरी विभागातील चिमुकले बालगोपाल आणि राधेच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी नटून-थटून उत्साहात कार्यक्रमाला उपस्थित होते.

वर्ग ५ ते १० मधील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोड स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रत्येक वर्गाची एक टीम याप्रमाणे एकूण १२ चमूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रथम गोपाल कृष्णाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर दहीहंडी फोड स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत वर्ग १० वीचा चमू विजयी ठरला. कार्यक्रमाचे महत्त्व सांगताना शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे यांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व तसेच गोपाल काल्याचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापिका अर्चना पन्नासे, प्रायमरी मुख्याध्यापिका पेंदाम मॅडम व पर्यवेक्षक श्री. विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. श्री. गिरी सर व अभिनिता कुंभारे मॅडम यांच्या पुढाकाराने तसेच महल्ले सर, ठाकरे मॅडम, बेलेकर सर, माटे मॅडम, बैलमारे मॅडम, डोईफोडे मॅडम, वडस्कर मॅडम, डायरे मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…